Dasara Melava 2022 | ठाकरेंनाच शिवाजी पार्कची परवानगी का मिळाली? अब्दुल सत्तार यांनी सांगितलं कारण, म्हणाले…

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – Dasara Melava 2022 | शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट (Shinde Group) दसरा मेळाव्यावरुन आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. अखेर शिवाजी पर्कवरील दसरा मेळाव्याचा (Dasara Melava 2022) वाद मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे ऐकून घेत उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. हा शिंदे गटासाठी एक मोठा धक्का तर ठाकरे गटाचा पहिला न्यायलयीन विजय मानला जात आहे.

 

शिंदे गटाने ठाकरे गटाची याचिका रद्द करण्यासंदर्भात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका करणार असल्याची चर्चा सुरु झाली असताना शिंदे गटाने बीकेसीवर (BKC Ground) होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यानिमित्त (Dasara Melava 2022) शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. या सर्व घडमाडींवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या निकालाबाबत भाष्य केलं आहे. न्यायालयाने शिंदे गटा ऐवजी ठाकरेंना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी का परवानगी दिली याचे कारण सत्तार यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाशिमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सत्तार यांनी न्यायालयाच्या निकालाची सरकार अंमलबजावणी करेल असे सांगितले.
न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. सरकार तो आदेश पाळेल.
तसेच शुक्रवारच्या सुनावणीमध्ये शिंदे गटालाही बीकेसीमध्ये मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

 

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, त्यांचा (ठाकरे) मेळावा आणि आमच्या मेळाव्यालाही परवानगी मिळालेली आहे.
आम्हाला बीकेसी वर मिळाली, त्यांना शिवाजी पार्कवर मिळाली. कारण त्यांचा अर्ज पहिला होता.
आमचा अर्ज नंतरचा होता, असंही सत्तार यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे त्यांनी सन्मानीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) पालन करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | abdul sattar talks about why mumbai hight court give permission to thackeray group instead of shinde group to take dasara melava on shivaji park

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता