Dasara Melava 2022 | ‘…तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा केला असता, BKC मैदान ‘मातोश्री’च्या जास्त जवळ’; शिंदे गटाची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park Ground) देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट (Thackeray Group), शिंदे गट (Shinde Group) आणि पालिकेच्या (BMC) वतीने युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालायत आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तुमचा युक्तिवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे तिन्ही बाजुंना सांगितले. या युक्तिवादानंतर न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava 2022) होणार? कोणत्या गटाचा होणार, यावर निर्णय दिला. ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे.

 

 

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आमची तयारी करतो, ते त्यांची तयारी करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawle) यांनी दिली आहे. तसेच आम्हाला वाद-विवाद करायचे नाहीत. आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) विचार मांडायचे आहेत, असंही गोगावले म्हणाले.

गोगावले पुढे म्हणाले, आम्ही शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्ही साजरा केला असता, असं भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही बीकेसीच्या मैदानात (BKC Ground) दसरा मेळावा साजरा करुन, बीकेसीदेखील बाळासाहेबांच्या मातोश्रीजवळ (Matoshree) आहे, अस गोगावले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वेळ एकच असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आता ते आम्ही ठरवू, असंही गोगावले यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | cm eknath shinde group bharatshet gogawale on shivsena dasara melava 2022 mumbai high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा