×
Homeताज्या बातम्याDasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं, एकनाथ शिंदेंची भाजप...

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं, एकनाथ शिंदेंची भाजप विरोधातील विधानं व्हायरल; शिंदे गट सापडला कोंडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत आज एकाच शिवसेनेचे (Shivsena) दोन दसरा मेळावे (Dasara Melava 2022) होत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) आरोप प्रत्यारोप सुरु असताना जुन्या संभाषणाचे व्हिडिओ समाजमाध्यमातून (Social Media) व्हायरल होत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM) पदाची शपथ घेतली. भाजप (BJP) सोबत सत्तास्थापन करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप विरोधात केलेल्या भाषणांच्या क्लिप विरोधकांकडून व्हायरल केले जात आहेत. यावर एकनाथ शिंदे आजच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा ग्रुप शिवसेनेतून बाहेर पडला असल्याचे सांगत एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटावर (Thackeray Group) सडकडून टीका केली जात आहे. तर विरोधकांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत, असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी भाजप विरोधात केलेली भाषणं, बाळासाहेबांनी भाजपच्या विरोधात केलेली विधानं सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. यामुळे शिंदे गट कोंडीत सापडला आहे.

एकनाथ शिंदेंचे ते भाषण व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘सत्तेसाठी सगळं सहन करणार नाही, शिवसेना महाराष्ट्रासाठी आहे, संपूर्ण देशावर राज्य करा…’ असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे, ‘मी शिवसैनिक आधी, मग मंत्री, भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही’, या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार (Shivsena-BJP Alliance Government) असताना देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होते. फडणवीस यांच्याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती,
त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एका सभेत भाजपबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की,
भाजपच्या दडपशाहीत मी मंत्रीपदी राहू शकत नाही, असे जाहीर सभेत सांगताना व्यासपीठावरच
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांच्याकडे शिंदे
यांनी राजीनामा (Resignation) दिला होता. त्यावेळचे ते भाषण देखील व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आजचा पहिलाच दसरा मेळावा (Dasara Melava 2022) होत आहे.
त्यामुळे शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.
तर शिवसेनेत बंड झाल्याने शिवसैनिकांना नवीन ऊर्जा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे देखील शक्तिप्रदर्शनाची तयारी करीत आहेत. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी राज्यातील नेते,
पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबईत हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title :- Dasara Melava 2022 | dasara melava 2022 cm eknath shinde dasara melava news updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

Andheri East Bypoll Election | अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ शिवसेनेच्या पाठीशी, शिंदे गटाला दिले ओपन चँलेंज

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News