Dasara Melava 2022 | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात मंचावर बाळासाहेबांची ‘ती’ खुर्ची, तर उद्धव ठाकरेंच्या मंचावर ‘या’ नेत्याला विशेष मान!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यानिमित्ताने मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईत एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava 2022) होत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर (BKC Ground) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) होत आहे. या दोन्ही मेळाव्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) स्टेजवर एक खास खुर्ची ठेवण्यात आली आहे.
या खुर्चीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांना विशेष स्थान देऊन मानवंदना देण्यात येणार आहे.
या खुर्चीमागे बाळासाहेब ठकरे यांच्या मागे नेहमी सावली सारखा फिरणारा थापा उभा राहणार आहे. विशेष म्हणजे या खुर्चीला एक वेगळा इतिहास आहे.
ठाण्यात ज्या खुर्चीवर बसून बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटचं भाषण दिलं होतं. ती खुर्ची शिंदे यांच्या मंचावर ठेवली जाणार आहे.

ठाकरेंच्या मंचावर ‘या’ नेत्याला मान

एकीकडे शिंदे गटाच्या मंचावर बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या मंचावर शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची रिकामी खुर्ची
ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता.
या मेळाव्यामध्ये देखील संजय राऊत यांच्यासाठी खास खुर्ची ठेवण्यात आली होती.
संजय राऊत सध्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी जेल मध्ये आहेत.

Web Title :- Dasara Melava 2022 | dasara melava cm eknath shinde special chair for balasaheb thackeray on stage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो…’ दसरा मेळाव्याच्या भाषणापूर्वी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्विट

Shinde Group | नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटात राडा, महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात दिला चोप; छेड काढल्याचा आरोप