Dasara Melava 2022 | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात आणखी एक धक्का, खासदार, आमदार करणार सीमोल्लंघन, शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) आज मुंबईत होत आहे. दोन्ही दसरा मेळाव्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने येत आहेत. दरम्यान शिंदे गटाचे (Shinde Group) समर्थक खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन खासदार आणि पाच आमदार (MLA) आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

मुंबईत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) होत आहे. तर बीकेसी मैदानावर (BKC Ground) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची पूर्ण तयारी झाल्याचं बोललं जातंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन खासदार आणि पाच आमदार सीमोल्लंघन करुन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसामाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

कृपाल तुमाने म्हणाले, खऱ्या रुपाने या राज्यात आणि या देशाचा जर आपण विचार केला तर
हिंदुत्वाचं रक्षण करणारा RSS ही एक संघटना आहे.
शिवसेना (Shivsena) ही एक पार्टी आहे.
त्यातुन हिंदुचे रक्षण, हिंदुची सेवा जनते पर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करत असतो.
बीकेसीवरील मेळावा हा ऐतिहासिक होणार.
शिवसेनेवर प्रेम करणारी जनता बीकेसी मैदानावर दिसेल.

तसेच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारापैंकी एक खासदार हा मुंबईचा असू शकतो.
तर दुसरा खासदार हा मराठवाड्यातील असू शकतो, असा मोठा दावा तुमाने यांनी केला आहे.
खासदार तुमाने यांच्या दाव्यानंतर हे खासदार आणि आमदार कोण आहेत, याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title :- Dasara Melava 2022 | dasara melava setback for uddhav thackeray two mp and five mla will join shinde faction in mumbai claims krupal tumane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Jalgaon ACB Trap | तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात