Dasara Melava 2022 | हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आणि दसरा मेळावा (Dasara Melava 2022) असे एक अतूट नाते आहे. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park in Mumbai) होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. शिवसेनेची राजकीय भूमिका, पुढील वाटचालीची दिशा ही शिवसैनिकां समोर मांडली जाते. आधी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अशी पिढ्यांपिढ्या सुरु असलेली ही परंपरा आहे. मात्र यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava 2022) नेमका कोणी घ्यायचा, यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. कारण दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी मुंबई महापालिकेला (BMC) अर्ज दाखल केला आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

मनिषा कायंदे म्हणाल्या, दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाचा (Shinde Group) मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या मुलाखतीनंतर स्पष्ट झालं की, ईडीच्या (ED) भीतीमुळे हे सर्व तिकडे गेले आहेत. हिंदुत्व वगैरे काही नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा हिंदुत्वाचा (Hindutva) मुखवटा गळून पडला आहे. एकच नेता, एकच विचार, एकच मैदान हे 50 वर्षांपासून गाजत अल्याचे कायंदे यांनी म्हटले.

 

तुमच्या शाखेसमोर आमची शाखा, तुमच्या मेळाव्यासमोर आमचा मेळावा हा थिल्लरपणा आणि पोरकटपणा सुरु आहे. कोणाच्या दबावाखाली चालू आहे हे दिसून येत आहे. दिल्लीश्वराकडून त्यांना सूचना मिळत आहेत, हे लक्षात येत आहे. त्या सूचनाप्रमाणे शिंदे गट वागत असल्याचा दावा कायंदे यांनी केला.

 

आपल्या पक्षाशी गद्दारी करुन उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
परंतु दसरा मेळावा (Dasara Melava 2022) हा शिवसेनेचा पारंपारिक आणि सांस्कृतीक कार्यक्रम आहे.
दसरा मेळावा तिथेच होणार असून असली आणि नकली कोण हे लोकांनी ओळखल्याचे मनिषा कायंदे यांनी म्हटले.

 

Web Title : – Dasara Melava 2022 | dasara rally controversy shiv sena cm eknath shinde shivsena leader manisha kayande

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा