Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा, म्हणाले-‘कायदा मोडला तर…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी (दि.5) एकनाथ शिंदे गटाचा (Eknath Shinde group) आणि उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray group) शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळवा (Dasara Melava 2022) होत आहे. या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्यातील (Dasara Melava 2022) या भाषणांबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. भाषण करताना कायदा (Law) मोडला तर कायदा आपलं काम करेल, असे फडणवीस म्हणाले. तसेच नेत्यांनी कायद्याच्या चौकटी राहून भाषणं करावीत असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून खुषखुषीत पद्धतीने, व्यंगातून किंवा अतिशयोक्तीतूनही मांडले जावेत. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था (Law and Order) नीट राखली जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न

काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये,
याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी,
असे आवाहन देखील फडणवीस यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना केले.
दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) पार्श्वभूमीवर दोन हजार पोलिसांचा (Mumbai Police)
बंदोबस्त मुबंईत तैनात करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक लोखोंच्या संख्येने या मेळाव्यासाठी हजर राहण्याची शक्यता असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title :- Dasara Melava 2022 | home minister devendra fadanvis commented on uddhav thackeray and eknath shinde group dasara melava speech and security

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | गेल्या अडीच वर्षांत PMRDA क्षेत्रात 3 हजार अनधिकृत बांधकामे

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार