Dasara Melava 2022 | एकनाथरावांना ‘एकटा नाथ’ होऊ देऊ नका, स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून जनतेला साद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात (BKC Ground) आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2022) दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांनी उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्या खूर्चीवर आज जयदेव ठाकरे पहायला मिळाले आणि त्यांनी शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) व्यासपीठावरुन भाषण देखील केले. यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले, सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका (Elections) घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात, असं मोठं विधान त्यांनी केलं.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिंदे गटाने (Shinde Group) आज थेट उद्धव ठाकरे यांच्या बंधूंना व्यासपीठावर आणून मोठा धक्का दिला. जयदेव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूची खुर्ची दिली. (Dasara Melava 2022)

 

जयदेव ठाकरे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले, एकनाथ हा माझा खूप आवडीचा.
आता तो मुख्यमंत्री झालाय त्यामुळे एकनाथराव असं म्हणावं लागेल.
मला चार-पाच दिवस झाले मला फोन येताहेत तुम्ही शिंदे गटात गेलात काय? असं विचारत होते.
मी काही कुणाच्याही गोठ्यात दावणीला बांधला जाणार नाही.
पण एकनाथ शिंदेंनी चार-पाच निर्णय घेतले ते खरंच चांगले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे.
माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकनाथ शिंदेंना एकटं पाडू नका. त्यांना एकटा नाथ होऊ देऊ नका.
यावेळी मी एक गोष्ट सांगेन की सगळं बरखास्त करा. परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात, असं जयदेव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | jaydev thackeray attends cm eknath shinde dussehra melava at mumbai bkc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा