Dasara Melava 2022 | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या अर्जुन खोतकरांच्या वाहनांच्या ताफ्याला समृद्धी महामार्गावर अपघात, 15 ते 16 वाहनांचे नुकसान

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दसरा मेळावा (Dasara Melava 2022) आहे. दसरा मेळाव्याला हजर राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. शिंदे गटातील नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे मुंबईला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) जात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway Daulatabad) अपघात झाला आहे. या अपघातात 15 ते 16 वाहनांचा चुराडा झाल्याची माहिती आहे. अपघातात (Accident) काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना या महामार्गावरुन जाता येत नाही. परंतु नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होता आहे.

 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) अर्जुन खोतकर यांच्या कर्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जात होता.
तेव्हा दौलताबाद येथे या ताफ्यातील गाड्यांचा हा अपघात झाला.
यासंदर्भात अर्जुन खोतकर म्हणाले, वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावरुन जाण्याचा निर्णय घेतला.
तसेच उद्घाटनापूर्वी गाड्या महामार्गावरुन नेण्याची आपली चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | shivsena rebel leader arjun khotkar vehicles accident while going for the dussehra rally of chief minister eknath shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त