Dasara Melava 2022  |  ‘दसरा मेळाव्याला गुलाल उधळत या पण…’, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे (Thackeray) विरुद्ध शिंदे गटाच्या (Shinde Group) पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कचं मैदान (Shivaji Park Ground) ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची (Dasara Melava 2022) परवानगी मिळताच शिवसैनिकांनी (Shiv Sainik) एकच जल्लोष केला आहे. न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय उद्धव ठाकरे म्हणाले?

विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो आज सार्थकी ठरला आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, या दसऱ्या मेळाव्याला (Dasara Melava 2022) उत्साहात या, शिस्तीने या, या आनंदाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

– दसरा मेळाव्यासाठी गुलाल उधळत या पण शिस्तीत या
– आपल्या परंपरेला गालबोट लागेल असे काही करु नका
– राज्य सरकार (State Government) आपली जबाबदारी पार पाडेल, अशी अपेक्षा
– न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, हा लोकशाहीचा विजय आहे.
– देशाची लोकशाही कशी राहील, यासाठी सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) निकाल महत्त्वाचा आहे.
– कोरोना काळ सोडला तर दसरा मेळावा कधीच चुकला नाही.
– शिवसेनेत दोन गट नाहीत, शिवसेना आता वाढली आहे.
– न्यायालयाने कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे.

 

 

Web Title :- Dasara Melava 2022 | shivsena uddhav thackeray first reaction on mumbai highcourt decision on dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा