Dasara Melava 2022 | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंचे भाषण होणार?, शिंदे गटाच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) पूर्वतयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. वानखेडे स्टेडियम जवळील (Wankhede Stadium) गरवारे क्लबमध्ये (Garware Club) ही बैठक घेण्यात आले.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांची गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा भेट झाली. तेव्हापासून राज ठाकरे दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2022) भाषण करणार अशी चर्चा सुरु झाली होती. यासंदर्भात शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना बोलवण्याचं कोणतंही नियोजन नाही. हिंदुत्वाचा विचार मानणारे पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करु, मात्र हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्यांना स्थान नाही, असं शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी सांगितले.

 

दसरा मेळावा उत्साहातच होईल, प्रत्येक विभागाची तयारी सुरु आहे.
दसरा विचारांचे सोनं लुटण्या करता निवडलेला दिवस आहे.
बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांवर एकनाथ शिंदे चालत राहिले आहेत.
मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार सांभाळून लोकांना भेटत आहेत.
मंत्रालय तुडूंब भरलेलं असतं, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

दसरा मेळाव्यात शिंदेंचा आणखी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’
आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत.
अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | will raj thackeray invited for speech in cm eknath shinde dasara melava deepak kesarkar reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…