Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dasara Melava 2022 |  शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट (Shinde Group) दसरा मेळाव्यावरुन आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी पर्कवरील दसरा मेळाव्याचा (Dasara Melava 2022) वाद मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला. ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिका अशा तीन याचिकांवर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तिन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता शिंदे गटाच्या बाजूने भाजपनेही (BJP) खिंड लढवण्यास सुरुवात केली आहे.

यंदाच्या दसऱ्याला बीकेसी वरील दसरा मेळावा (Dasara Melava 2022) आणि शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’ आयोजित होईल, अशा शब्दात भाजपने उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Spokesperson Keshav Upadhyay) यांनी अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी कोर्टाने उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली असली तरी मेळाव्यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे (BMC) अर्ज
केला होता. त्यानंतर शिंदेगटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यासाठी अर्ज केला होता.
अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचं (Law and Order) कारण देत मुंबई महानगरपालिकेने दोघांनाही परवानगी
नाकारली होती. यानंतर शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेत दाद मागितली होती.
यावर सुनावणी घेत न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना मोठा दिलास देत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी दिली.

Web Title :-  Dasara Melava | dasara melava at bkc and hasara melava at shivaji park bjp criticize shiv sena uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण

Aurangabad Accident News | शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | लोणीकाळभोरमध्ये कुत्र्याने पळवली कोंबडी, जाब विचारायला गेलेल्या मालकाला जमावाची बेदम मारहाण