Dasra Melava 2022 | पाणी पुरवठामंत्र्यांनी दसरा मेळाव्यासाठी रचले गाणे, ’आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी’, शिंदे गटाची जोरदार तयारी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava 2022) पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या संकल्पनेतून एक गाणे तयार केले आहे. या गाण्यात आम्हीच शिवसेनेचे (Shivsena) मानकरी असल्याचे म्हटले आहे. आज हे गाणे रिलिज करण्यात आले. ’आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी’ अशा ओळी असलेले हे गाणे गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार ’प्रभारंग फिल्म्स यांनी तयार केले आहे. तर आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे. (Dasra Melava 2022)

 

गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकाने (Shiv Sainik) अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकेच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचे वचन आहे. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

 

आनंद शिंदे यांना घेऊन गाणे तयार करण्याची शिवसेनेची तयारी असतानाच आज शिंदे गटाने थेट गाणे रिलिजही केले.
एकुणच शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या चढाओढीत आघाडी घेतली आहे. (Dasra Melava 2022)

 

शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातुन माणसे बीकेसी मैदानावर (BKC Ground) आणण्यात येणार आहेत.
यासाठी शिंदे गटाने 10 कोटी रूपये रोख भरून एसटी महामंडळाच्या 1700 बसेसची बुकिंग केली आहे.

 

Web Title :- Dasra Melava 2022 | amhi shivsenache mankari song released by shinde group leader gulabrao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त