Dasra Melava 2022 | शिंदे गटाचा शाही दसरा मेळावा, मंचावर होलोग्राम टेक्नॉलॉजीने बाळासाहेबांची प्रतिमा, 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन; जय्यत तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत दसरा मेळाव्याची (Dasra Melava 2022) जय्यत तयारी शिंदे गटाने (Shinde Group) केली आहे. एकुणच हा दसरा मेळावा प्रचंड प्रमाणात साजरा करण्याचा घाट शिंदे गटाने घातला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो लोक एसटी बसेस (ST Bus) आणि खाजगी गाड्यांनी मुंबईकडे निघाले आहेत. मेळाव्यासाठी (Dasra Melava 2022) शिंदे गट होलोग्राम टेक्नॉलॉजीचा (Hologram Technology) वापर करुन बाळासाहेबांची प्रतिमा मंचावर उभी करणार आहे. शिवाय 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजनही केले जाणार आहे.

 

एकनाथ शिंदे गट बाळासाहेबांचे 40 जुने व्हिडीओ मंचावर दाखवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भाषणात हे व्हिडीओ दाखवून त्याद्वारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी कशी तडजोड केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात (Dasra Melava 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन केले जाईल. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samantha) हे एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देणार आहेत. या आधी गीनिज बूकमध्ये 11 फुटी चांदीच्या तलवारीची नोंद आहे. त्यामुळे हा नवा विक्रम होणार आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक येणार आहेत.
या लोकांसाठी खाण्या-पिण्याची सोय व्यासपीठाच्या बाजूलाच केली आहे.
पाच लाख वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची सोय केली जाणार आहे.

 

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फुट मंच तयार केला आहे. या मंचावर उद्या ठाकरे गटातील व्यक्ती दिसू शकते.
फक्त शिवसैनिक (Shiv Sainik) किंवा कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे परिवारातील व्यक्ती सुद्धा
शिंदे गटासोबत असल्याचे यातून सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
या मेळाव्यासाठी 8 वक्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

 

Web Title :- Dasra Melava 2022 | eknath shinde dasara melava balasaheb s animation 51 feet sword Dasra Melava 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त