Data Plans For Airtel-Reliance Jio | केवळ 251 रुपयांत प्रीपेड प्लान्समध्ये मिळावा 50 GB डेटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Data Plans For Airtel-Reliance Jio | सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे डेटा प्लान्स आणत आहे. मोबाईलचा डेटा (Data Plans For Airtel-Reliance Jio) दिवस पूर्ण होण्यापूर्वीच संपत असल्याची अनेक युजर्सची तक्रार आहे. अशातच अतिरिक्त डेटाची गरज भासते. जर तुम्हाला अशीच समस्या येत असेल तर ही बातीमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे डेटा प्लान.

 

रिलायन्स जिओचा 251 रुपयांचा प्लान (Data Plans For Reliance Jio)

या Reliance Jio प्लानमध्ये युजर्सना 50 GB डेटा ऑफर केला जात आहे. कंपनीच्या काही डेटा प्लानमध्ये युजर्सना सध्याच्या प्लानच्या वैधतेइतकीच वैधता (Validity) मिळते. मात्र, या प्लानमध्ये असे अजिबात नाही. रिचार्ज केल्यावर युजर्सला केवळ 30 दिवसांची वैधता आहे.

 

एअरटेलचा 251 रुपयांचा प्लान (Data Plans For Airtel)

एअरटेलच्या (Airtel) या प्लानमध्ये कंपनी आपल्या युजर्सना 50 GB डेटा देते. मात्र वैधतेच्या बाबतीत हा प्लान Reliance Jio सारखा नाही. हा प्लान युजर्सना सध्याच्या प्लानच्या वैधतेइतकीच वैधता देते, जी सर्वोत्तम आहे. या प्लानची खास बाब आहे. उदा. जर तुमच्या चालु प्लानची वैधता आता 50 पेक्षा अधिक असेल किंवा 30 दिवस असेल. तर तुम्हाला फायदा आहे. वर नमूद केलेल्या दोन्ही प्रीपेड प्लानसह (Prepaid plan),
युजर्सना डेटा व्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (Unlimited voice calling)
किंवा कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त एसएमएस किंवा इतर कोणत्याच सुविधेचा लाभ मिळणार नाही.
कराण हे डेटा प्लान (Data Plans) आहेत जे तुमचा डेली डेटा संपल्यानंतर काम करतील. (Data Plans For Airtel-Reliance Jio)

 

Web Title :- Data Plans For Airtel-Reliance Jio | airtel and reliance jio fifty gb data plans read details about airtel plan vs jio plans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा