चांद्रयान-२ ‘या’ दिवशी चंद्राकडे झेपावणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत दुसऱ्यांदा चंद्रावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेची तारीख आज इस्रोने जाहीर केली आहे. १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.

इस्रोचे संचालक डॉ. के. सिवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान १९ जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते २० किंवा २१ जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर चांद्रयान १५ जुलै रोजी लॉंच केले जाणार आहे. चांद्रयान-२ मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके अंतराळात घेऊन जाईल. हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे.

भारताने २००९ मध्ये चांद्रयान-१ चंद्रावर पाठवले होते. आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही  करण्यात आली.

आरोग्य विषयक वृत्त –

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही