साईबाबांचा ‘हा’ संदेश फॉरवर्ड केल्यानं ‘पदोन्नती’, DFO कार्यालयानं काढलं पत्र, सर्वत्र खळबळ

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या दतिया जिल्ह्यात एक आनोखे प्रकरण समोर आले, यात एका अधिकाऱ्याने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मेसेजवर अधिकृत स्वाक्षरी केली. दतिया जिल्ह्यात वनमंडळ अधिकाऱ्यांनी डीएफओ कार्यालयाने दोन दिवसांपासून सर्व एसडीओ आणि रेंजर्सला एक पत्र पाठवले. यानंतर हे पत्र प्रशासकीय विभागात चर्चेचा विषय बनला. सत्य हे आहे की यामध्ये एक अंधश्रद्धा असलेला मेसेज आहे आणि डीएफओने यावर चुकून स्वाक्षरी केली.

पत्रात लिहिले होते की, हा मेसेज सर्वांना पाठवा, एका महिलेने आजारी असताना स्वप्न पाहिले तर साईबाबा तिला पाणी पाजत आहे. सकाळी जेव्हा ही महिला जागी झाली तेव्हा ती आजारपणातून बाहेर आली होती. तिच्या बाजूला एक कागदाचा तुकडा पडला होता, ज्यावर Sai baba is the living God in the world. असे लिहिले होते. एका ऑफिसरने हा मेसेज लोकांना सेंड केला तर त्याला प्रमोशन मिळाले. एका माणसाने तोच मेसेज डिलिट केला तर 13 दिवसात त्याला त्याचे सर्व काही गमावावे लागले. हा मेसेज तुम्ही 13 लोकांना पाठवा.

ही कागदपत्र डीएफओ प्रियांशी राठोर पर्यंत पोहचली आणि त्यांनी काहीही न पाहता यावर रिसीविंग स्वाक्षरी केली. यानंतर क्लार्क बालकृष्ण यांनी देखील यावर न पाहता स्वाक्षरी केली आणि वनमंडळ अधिकाऱ्यांचे शिक्का लावून एसडीओ, रेंजर आणि इतर अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पाठवले.

जेव्हा हे पत्र विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले तेव्हा ते अचंबित झाले. डीएफओ प्रियांशी राठोर यांनी सांगितले की, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक पत्रावर रिसीविंग म्हणून स्वाक्षरी करावी लागते. स्वाक्षरी केल्यानंतर क्लार्क पांडे यांनी हे वेगळे केले नाही, तसेच जारी केले.

आरोग्यविषयक वृत्त –