मैत्रिणीला चुकूनही देऊ नका ‘या’ डेटिंग टिप्स

वृत्तसंस्था – डेटींग शब्द उच्चारताच अनेकांच्या मनात लाडू फुटायला सुरुवात होते. प्रत्येकाची इच्छा असते की, आपली डेट ही यादगार आणि चांगली पार पडावी. यासाठी अनेकदा आपल्या मित्र मैत्रिणींकडून सल्ले घेणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. पण जर तुमची मैत्रीण कुणाला डेट करत असेल आणि तिच्या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगत असेल तर तुमचं कर्तव्य ठरतं की, तुम्ही योग्य सल्ला द्यावा. अनेकदा मैत्रिणीकडून चुकीचे सल्ले दिले जातात आणि यामुळे त्यांची मैत्रीण अडचणीत सापडते. त्यामुळे तुम्ही कोणते सल्ले टाळले पाहिजेत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
१) वजन कमी केल्याने बॉयफ्रेन्ड लगेच मिळेल- प्रेमाचा अर्थच असा असतो की तुमचा पार्टनर तुम्हाला तुमच्या गुण दोषासहीत स्वीकार करतो किंवा करते. यामुळे तुम्हाला स्वत:ला काही बदलायची गरज नसते. चांगलं आणि फिट दिसणं प्रत्येकासाठीच फायद्याचं असतं. याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. पण कुणाला दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी स्वत:ला बदलण्याची गरज नाही.
२) जो सुंदर असेल त्याच्यासोबतच डेटला जा- आजकाल कितीही नाही म्हटलं तरी रंग आणि रुपालाच भाळणारे सारे दिसतात. क्वचितच मन पाहून प्रेमात पडलेली व्यक्ती पाहायला मिळेल. कारण सुंदरतेपेक्षाही तो माणूस चांगला असणं गरजेचे आहे. त्यामुळे असा सल्ला देणं नक्कीच योग्य नाही. कारण चेहऱ्याची सुंदरता फार काळ टिकत नाही. त्यामुळे माणूस चांगला असायला हवा.
३) अशा मुलासोबत डेटला जा, जो तुझ्यावर पैसे खर्च करेल- अनेक मुलींना अपेक्षा असते मुलाने भरमसाठ पैसा तिच्यावर खर्च करावा. तिला गिफ्ट द्यावं, इकडं तिकडं फिरवावं. तसं तर ही अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही परंतु केवळ पैसा खर्च करतो हे एकमेव कारण पाहून डेट जाण्याचा सल्ला देणं मात्र चुकीचं आहे. कारण हा ल्ला अजिबात प्रॅक्टिकल नाही. केवळ पैसा पाहणं हे कितपत योग्य आहे. शेवटी मुद्दा तोच येतो माणूसच चांगला नसेल तर पैशाचं काय करणार. त्यामुळे असा सल्ला चुकुनही मैत्रिणीला देऊ नका.
तुम्ही तुमच्या मैत्रिणीला काय सल्ला देताय यापेक्षा काय सल्ला टाळताय हेदेखील महत्त्वाचे आहे. काही चांगले मार्गदर्शन करता नाही तर एकवेळ ठिक आहे परंतु काही चुकीचे मार्गदर्शन मात्र नक्कीच करू नका. तुमचा एक बरोबर सल्ला तुमच्या मैत्रिणीचं जीवन सुखरूप करू शकतं.