धक्कादायक ! डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात ; ५० लाखाचा गंडा घालून निवृत्त विंग कमांडरच्या पत्नीचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या निवृत्त विंग कमांडरच्या पत्निच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. निवृत्त विंग कमांडरच्या पत्नीचे एका डेटिंग अ‍ॅपद्वारे ओळख झालेल्या व्यक्तीने निघृण खून केला. निवृत्त विंग कमांडर मीनू जैन यांच्याकडून भामट्याने ५० लाख रुपये लुबाडून जैन यांचा खून केला.

मीनू जैन यांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी तब्बल पन्नास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुंतले होते. ज्यावेळी मीनू यांचा मृतदेह आढळून आला त्यावेळी त्यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, त्यांचे दोन फोन न सापडल्यामुळे पोलिसांना संशय आला.

दिल्लीतील एअरफोर्स अँड नेवल अपार्टमेंटमध्ये वायूसेनेचे निवृत्त विंक कमांडर विनोद जैन हे त्यांच्या पत्नी समवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मीनू यांच्या प्लॅटमध्ये आलेल्या व्यक्तीच्या कारची एन्ट्री पोलिसांना रजिस्टरमध्ये आढळली. सीसीटीव्ही फूटेजमध्येही तोच नंबर असलेली गाडी दिसली. पोलिसांनी त्या दिशेने तपास करत असताना गाडीचा नंबर खोटा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाकडून संशयित मारेकऱ्याचे वर्णन घेतले. पोलिसांनी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिले असता मारेकऱ्याने वापरलेली कार ड्रायव्हर साईडला घासल्याचे दिसले. दरम्यान मीनू यांचा एक मोबाईल २६ एप्रिलला सकाळी पाच वाजता गुरुग्रामजवळ बंद झाल्याचे मोबाईल रेकॉर्डवरून समजले. पोलिसांनी तात्काळ गुरुग्रामच्या दिशेन जाणाऱ्या टोलनाक्यांवरील जवळपास तीन हजार गाड्यांचे सीसीटीव्ही तपासले. पोलीस संशयीत व्यक्तीचा तपास घेत असताना पोलीस शोध घेत असलेली गाडी जयपूरमधील एका घराबाहेर पोलिसांना सापडली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धरपकड करत आरोपी दिनेश दीक्षितला ताब्यात घेतले.

मीनू जैन यांचा २६ एप्रिल रोजी खून केला करण्यात आला होता. मिनू जैन यांचा खून सुनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिनेशने दुपारी अडीचच्या सुमारास मीनू यांच्या घराखाली आला. मीनू यांना कॉल करून त्याने खाली बोलावले. रात्री पावणे नऊच्या सुमारास ते दोघे बाजारात जाण्यासाठी दिनेशच्या कारमधून निघाले. अर्ध्या तासाने ते परत आले. रात्री दीनेशने मीनू यांना गुंगीचे औषध देऊन त्यांने ५० लाखांचे दागिने आणि पैसे घेतले.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याने मीनू जैन यांचा टॉवेल आणि उशिने तोंड दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनू यांचे वडील आणि भाऊ यांना त्या मृतावस्थेत आढळल्या. आरोपी दिनेश याच्यावर कर्ज असल्याने तो विवाहीत महिलांशी डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क करत होता. त्यांचा विश्वास संपादन करून पैसे उकळत असल्याचे तापासात समोर आले आहे.