Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर  येथे  दत्त जन्म व  दत्त जयंती (Dattatreya Jayanti 2022) निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक 4 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरून (Dattatreya Jayanti 2022) वळविण्याचे आदेश दिले आहेत.

कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळवरून बंगळुरू-पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यातून पुण्याकडे आणि सासवड ते कापूरहोळ या मार्गावरील अवजड वाहने सासवड वीरमार्गे सारोळा तसेच सासवड-दिवेघाटमार्गे कात्रज चौक अशी जातील.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथे 5 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांच्या वतीने दत्त जयंती सोहळा (Dattatreya Jayanti 2022) साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तामिळनाडू,
कर्नाटक, राजस्थान या राज्यांतूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात.
जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदिर या ठिकाणीदेखील भाविक जात असतात.
दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड-कापूरहोळ या मार्गावर असून,
यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील
अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title :-  Dattatreya Jayanti – 2022 | Traffic changes on Saswad-Kapurhol road in view of Datta Jayanti, know alternative route

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

Pune Crime | 14 व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, 4 ठेकेदारांवर FIR; बाणेर मधील घटना