दत्तात्रय गवळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमीत्त कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठाणच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा सन २०१९ या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील हनुमान विद्यालयातील शिक्षक दत्तात्रय काशिनाथ गवळी यांना जाहीर झाला होता. शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इंदापूर येथील साई गोल्डन लाॅन्स या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे हस्ते दत्तात्रय गवळी यांना हार, फेटा, शाल, श्रीफळ व स्मृृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठाणच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल तसेच अंगणवाडी सेविका व मुख्याध्यापक मिळून १७५ शिक्षकांना गुणवंत शिक्षक व आदर्श शिक्षक पुरस्कार देवुन सापत्निक सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ व फेटा बांधुन स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

 

You might also like