दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित आ.कुल यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध विषयांवर दौंडचे आमदार राहुल कूल यांनी जिल्हाधिकारी मा.नवल किशोर राम यांची भेट घेतली यावेळी दौंड तालुक्यातील टंचाई निवारण संबंधित विविध उपाययोजना, सत्ता प्रकार ब जमिनींचा प्रश्न, दौंड नगर पालिका कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच खाजगी जमिनींवरील वन जमीन हा शेरा हटवणे आदी प्रमुख विषयांवर चर्चा करणयात आली.

दौंडच्या विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, दौंड पुरंदर चे प्रांताधिकारी गायकवाड, दौंड नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात तसेच महसूल, वन व भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.