सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर ‘तिरंगा’ पाहून पती आणि मुलीचे डोळे ‘पाणावले’ तरीही अभिमानानं ‘सॅल्यूट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज कालावश झाल्या आहेत. त्याच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. तसंच त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते.

अंतिम यात्रेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला होता. ज्या कोणी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटलेले पाहिले त्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहिले नाही. त्यात फक्त नेते मंडळीच नाहीतर त्यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी स्वराज अधिक भावूक झाले होते. सुषमा स्वराज यांना तिरंग्यात पाहून दोघांनी त्यांच्या पार्थिवाला सलामी दिली.

त्यांच्या अंत्यविधीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तेथे उपस्थित राहून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली दिली.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नवी दिल्ली मधील एम्स रुग्णालयात सुषमा स्वराज यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मंगळवारी घाबरल्यासारखे होत होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्या उपचारासाठी लागली होती. मात्र त्यांना सुषमा स्वराज यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. त्यांची निधनाची बातमी ऐकूण तेथील डॉक्टरांना आपले अश्रू अनावर झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त