देव पूजा करणाऱ्या सासूचा सुनेनं ‘रॉड’ घालून केला खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सासूच्या सततच्या छळाला कंटाळून सुनेने टोकाचे पाऊल उचलत सासूचा डोक्यात रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. तब्बल दहा दिवसांनी हा खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिला दहा दिवस बेपत्ता होती. तिचा मृतदेह एका मोकळ्या जागेत आढळून आला असून पोलिसांनी सुने विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मंदाकिनी पाटील असे मृत सासूचे नाव आहे. तर छाया असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे.

मंदाकिनी यांचा लहान मुलगा सचिन यांच्याशी तीचं लग्न झालं होत. सचिनने हे दुसरं लग्न केले होते. लग्न झाल्यापासूनच मंदाकिनी आणी छाया यांचे कधीच पटले नाही. त्या छायाला कायम घालून पाडून बोलत होत्या असा आरोप केला जातोय. या सततच्या त्रासाला सून छाया यांनी कंटाळून त्यांचा डोक्यात रॉड घालून खून केला.

छाया यांनी मंदाकिनी देवपूजा करत असताना घरामध्ये खून केला. घटनेच्या दिवशी घरामध्ये कोणीच नसल्याची खात्री झाल्यानंतर छाया यांनी पूजेसाठी बसलेल्या सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर छायाने सासूचा मृतदेह पोत्यात टाकून एका मोकळ्या जागेत फेकून दिला. मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सून छाया हिच्यावर संशय आल्याने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशी दरम्यान तिने खूनाची कबूली दिली. छायाने सासू मंदाकिनी यांचा खून करून मृतदेह एका प्लास्टीकच्या पिशवीत भरून मोकळ्या जागेत फेकून दिला. त्यानंतर दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून सून छाया हिला तब्यात घेतले. प्रथमदर्शनी हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचे भासवण्यात आले. मात्र पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नसल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी छायाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने खूनाची कबुली दिली.