विधायक ! सासूच्या पार्थिवाला चार सुनांनी दिला ‘खांदा’

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – परंपरेप्रमाणे पार्थिवाला खांदा देण्याचे काम हे पुरुषचं करत असतात. मात्र बीडमधील चार सुनांनी ही प्रथा मोडीत काढली आहे. त्यांनी आपल्या सासूच्या पार्थिवाला खांदा देत नवीन पायंडा पाडला. बीडमधील काशिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचे निधन झाले. त्यानंतर सासूच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली असता घरातील चारही सुनांनी खांदा देत एक नवीन आदर्श घालून दिला.

सासू आणि सुनांचे नाते म्हणजे फक्त भांडणे हा गैरसमज आपल्या समाजात तयार झालेला आहे. त्यामुळे या सुनांनी या गैरसमजाला छेद देत नवीन पायंडा पाडला. नाईकवाडे कुटुंबातील सुनांच्या केवळ कालच चर्चा झाल्या नाही तर त्यांच्या अनेक वेळा चर्चा होत असतात. कोणताही सण असला तरी त्या मोठ्या आनंदाने एकत्रितपणे साजरा करतात. त्यामुळे या सुनांच्या या कृत्याची सर्व बीडमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. मनिषा जालिंदर नाईकवाडे, मीना मच्छिंद्र नाईकवाडे, लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे अशी या चार सुनांची नावे आहेत.

दरम्यान, या कृत्याने या सुनांनी नवीन आदर्श घालून दिला असून यापुढे अनेक सुना त्यांच्या या कृत्याचे अनुकरण करतील अशी आशा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –