काय सांगता ! FB वरील मित्रासाठी सुनेनं घरातलं चक्क 22 तोळे सोनं चोरलं

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामधील हिंगणघाट येथे घडली आहे. याविषयी सुधाकर विठोबाजी कदम यांनी तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुनेला तिच्या मित्रासहित अटक केली आहे. आरोपी अविनाश गणपत भालेराव व सुनेला न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिंगणघाट येथील सुधाकर विठोबाजी कदम यांनी अज्ञात व्यक्तीने कपाटातील पाच लाख रूपये किंमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी कदम कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली. चौकशीच्या वेळी छोटी सून थोडी घाबरलेली आणि प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. तिची अधिक चौकशी केली असता तिने फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी घरातील दागिने चोरल्याची कबुली दिली.

फेसबुकच्या माध्यमातून तिची आणि धनंजय जाधवसोबत ओळख झाली होती. त्याचा फायदा घेत त्याने वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे सांगत उपचार करण्यासाठी मदत मागितली होती. त्याला मदत करण्यासाठी सुनेला घरातील दागिने चार वेळा चोरी करत चोरले. दागिने घेऊन तो पसार झाला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचे अकाऊंट फेक नावाने असल्याचे कळले. मात्र त्याच्या मोबाइल नंबरच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आला. त्याला नांदेड येथून राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने घरी व काही नांदेडच्या उत्तम ज्वेलर्सला विकल्याचे मान्य केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like