टॅकरच्या धडकेत कर्नलची मुलगी ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील ऑईलच्या टॅंकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरच्या वैदूवाडी येथील पुलावर झाली. मृत तरुणी ही तरुणी ही एका कर्नलची मुलगी असल्याचे समोर आले आहे.

गार्गी विजय मिश्रा (वय १९) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्गी मिश्रा ही मंगळवारी दुपारी हडपसर येथील वैदूवाडी पुलावरून तिच्या दुचाकीवरून जात होती. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या ऑईल टॅंकरची दुचाकीला धडक बसली. यात ती खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यावेळी नागरिकांनी तिला उचलून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोवर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर अपघात झाल्यानंतर टॅंकरचालक लागलीच पसार झाला. दरम्यान मृत तरुणी ही लष्करातील कर्नलची मुलगी असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.