अभिमानास्पद ! सोलापूरच्या शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी

पंढरपूर :  पोलीसनामा ऑनलाईन – माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या पल्लवी काळे हिची भारतीय ‘नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडन्ट’ पदासाठी निवड झाली आहे. केंद्रीय स्टाफ सिलेक्शनच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीने गावात नौदलातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.

पल्लवीचे आई-वडील सुनील आणि संतोषी काळे  हे शेती करतात.  पल्लवीचं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण भोगेवाडी जि. प. प्राथमिक शाळेत झालं आहे. पाचवी ते बारावीचं शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा तर मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी सिंहगड इन्स्टिट्युट येथे पूर्ण केली आहे. ती पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने मिळवलेल्या यशामुळे सर्वच स्तरातून तीचं विशेष कौतुक होतं आहे.
Visit : Policenama.com