मुलगी पळून गेल्यानं संतापलेल्या कुटूंबियांनी मुलाच्या घरच्यांना ‘विवस्त्र’ करून लटकवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एक मुलगी प्रियकरासोबत पळून जाणे प्रियकराच्या घरच्यांना चांगलेच महागात पडले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नातेवाईकाचे दोन महिला आणि एका पुरुषाचे अपहरण करत कोरड्या विहिरीत ओलीस ठेवले आणि क्रूरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नातेवाईकास दोन महिला आणि एका पुरुषाला मध्य प्रदेशातून अपहरण केले. झालावाड जिल्ह्यातील भालता पोलिस स्टेशन परिसरात आरोपींनी त्यांना कोरड्या विहिरीत निर्वस्त्र लटकावले आणि त्यांना जोरदार मारहाण केली. आरोपींनी महिलांना इतक्या निर्दयतेने मारहाण केली की 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात झाला आहे. यावेळी केवल चंद नावाच्या व्यक्तीच्या हातात विस्तव ठेवण्यात आला.

अपहरण झालेल्या महिला मंगूबाईने सांगितले की, मध्य प्रदेशातील सेमली गावाजवळ एक कथा आयोजित करण्यात आली होती, तेथे भलता पोलीस स्टेशन परिसरातील मुचकापुरा गावात राहणारी तिच्या काकाची मुलगी आली होती. दरम्यान, मुलगी तिच्या सासरच्या बाजूच्या अमरपुरा येथे राहणाऱ्या एका मुलासह फरार झाली, या संशयावरून मुलीच्या कुटूंबीयांनी मध्य प्रदेशातील घरातून मंगूबाई आणि तिचा मामा केवल चंद आणि मामी यांचे अपहरण केले.

अपहरणकर्त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळताच भालता पोलीस स्टेशन पोलिसांनी मुचकापुरा येथे पोहोचत ओलीस ठेवलेल्या तिघांची सुटका केली. मात्र, यावेळी आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. अपहरण घटना मध्य प्रदेशमधील असल्याने खिलचीपूर पोलिस ठाण्यात झालेला प्रकार नोंदविण्यात आला. त्याचबरोबर पीडित मुलीच्या वतीनेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस संबंधित सहा आरोपींचा शोध घेत आहे.