Post_Banner_Top

‘शोले’तील सांबाच्या मुली ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शोले हा सिनेमा भारतीय सिनेमासृष्टीत इतिहास घडवणारा असा सिनेमा ठरला आहे. यातील अरे ओ सांबा… हा डायलॉग तर आजही लोकांच्या ओठावर दिसतो. या सिनेमाताली प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. यात सांबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन. हे सांगायचा मुद्दा असा आहे की आता या सांबाच्या मुली लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

मॅक मोहन यांच्या मुलींची नावे आहेत मंजरी आणि विनती. लवकरच या दोघी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्केटींगबोर्डवर आधारीत एक बॉलिवूड सिनेमा लवकरच येत आहे. याच सिनेमातून सांबाच्या मुली सिनेसृष्टीत पाऊल टाकत आहेत. मंजरी या सिनेमाची लेखिका-दिग्दर्शिका आहे तर विनती ही सहलेखिका असून निर्मातीही आहे. डेजर्ट डॉफ्लिन असं या सिनेमाचं नाव आहे. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा मंजरी आणि विनती यांचा हा सिनेमा लवकरच येणार आहे.

सध्या या सिनेमाचा सेट उभारण्याचं काम सुरु आहे. उदयपूरच्या खेमपूर गावात स्केटींगचं मैदान बनवण्यात येणार आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाले तर, राजस्थानमधील एका ग्रामीण भागातील १६ वर्षीय प्रेरणा आणि लॉस एंजिलिसमधील ३४ वर्षीय जेसिका यांची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. याबाबत बोलताना मंजरीने सांगितले की, मध्य प्रदेशमधील एका गावावर आधारीत स्केटबोर्डिंग माहितीपट पाहून मी सिनेमाचा विचार केला आहे.

Loading...
You might also like