दौंडमध्ये राष्ट्रवादी – महाघाडीला आणखी एक धक्का ! विद्यमान काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

दौंड (अब्बास शेख) : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असून आज शनिवारी दौंड तालुका काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष अशोकराव फरगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. फरगडे यांच्या प्रवेशाने दौंड तालुक्यातील महाघाडीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला आहे.

याबाबत अशोक फरगडे यांनी बोलताना दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षाचा वापर फक्त लोकसभा आणि विधानसभे पुरताच करत आली आहे. राष्ट्रवादी कधी आघाडी धर्मही पाळत नाही आणि काँग्रेसही येथे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असून, विद्यमान आमदार राहुल कुल हे विकासाच्या दृष्टीने एक जाणकार नेते आहेत आणि त्यांनी दौंडला विकासाच्या दृष्टीने जो निधी आणला आहे. त्यामुळे आपण प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com