दौंड : पारगाव येथे वीज कोसळून शेतकरी गंभीर जखमी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतात घास कापत असणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली असून यामध्ये हे वृद्ध शेतकरी ५०% भाजले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पारगाव येथील वृद्ध शेतकरी शिवाजी यादवराव जगदाळे हे शेतामध्ये घास कापण्यासाठी गेले होते. त्यावेळी पावसाचे ढग दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला होता. यावेळी घास कापत असलेले शिवाजी जगदाळे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या संपूर्ण अंगावर वीज न पडता अंगाला घासून गेली मात्र यामुळे त्यांचे अंग सुमारे पन्नास टक्के भाजले गेले होते. त्यांच्या कुटुंबियांना याची खबर लागताच त्यांनी त्वरित केडगाव येथील साई दर्शन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

वृद्ध शेतकरी शिवाजी जगदाळे हे पारगाव येथील रेणुका देवी दुध संस्थेचे उपाध्यक्ष किसनराव शिवाजी जगदाळे यांचे वडील असून दौंड काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांचे मामा आहेत.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like