दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शफीक शेख

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी शफीक रसूल शेख यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हाजी सोहेल खान यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले तर दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासो पवार व अजित शितोळे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मागील आठवड्यामध्ये शफीक मुलाणी यांनी आपल्या दौंड राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता यानंतर या पदावर दौंड तालुक्यातील वरवंड येथील शफीक शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शफीक शेख यावेळी बोलताना समाजातील विविध अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा तसेच समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होत असेल त्यावर आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

आरोग्यविषय वृत्त –