दौंडच्या शिरपेचात स्वतंत्र प्रांत कार्यालयाचा तुरा, आ. राहुल कूल यांच्या प्रयत्नांना मोठे यश

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष बाबीतून दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाला मंजुरी दिली होती. यानंतर आता शासन निर्णय होऊन तशी अधिसूचनाही काढण्यात आली आहे. प्रांत कार्यालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले होते.

प्रांत कार्यालयाची अधिसुचना १८ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने काढली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी आज यवत येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. विशेष म्हणजे प्रांत कार्यालयाची ही अधी सूचना दौंडचे दिवंगत आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या जयंती दिवशीच प्रसिद्द झाल्याने दौंडमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत आमदार राहुल कुल यांनी अधिक माहिती देताना मागील सात वर्षपूर्वी दौंड येथे प्रांत कार्यालय व्हावे अशी मागणी आपण त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या असणाऱ्या सरकारकडे केली होती. मात्र, त्यावेळी येथील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत असतानाही प्रांत कार्यालय पुणे येथे व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुणे येथे मंजूर झाले होते मात्र आम्ही या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत प्रांत कार्यालय भौगोलिक परिस्थिती पाहून दौंड किंवा पुरंदर येथे घेण्याचा निर्णय दिला.

मात्र, दौंड येथे प्रांत कार्यालय झाल्यास याचे श्रेय मला मिळेल यासाठी विरोधकांनी दौंड ऐवजी पुरंदरमध्ये हे कार्यालय घेतले. पुरंदर येथे असलेले प्रांत कार्यालय दौंडच्या जनतेच्या सोयीचे नसल्याने दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय व्हावे, यासाठी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले होते फक्त तांत्रिक बाबी पूर्ण करून शासन निर्णय होणार होता तो आज झाला असल्याने शासनाचा हा निर्णय संपूर्ण दौंड तालुक्याचे दृष्टीने खूप महत्त्वाचा समजला जात आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like