दौंडमधील स्वामी चिंचोली गावच्या माजी सरपंचाची अनोखी सेवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राजकारण करणाारे लोक नेहमी स्वार्थ पाहतात, असे बोलले जाते. त्यासंदर्भात कोरोनाबाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीचे माजी युवा सरपंच अझरुद्दीन शौकत शेख याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी कोरोनाची जनजागृती करण्यासाठी गावासह वाड्यावस्त्यावर डेटोल साबणाचे वाटप केले. त्यानंतर स्वतः पाठीवर पंप घेउन घरोघरी जाउन नागरिकांच्या अंगावर डेटोल फवारणी केले आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यभरात हाहाकार माजला आहे. अशास्थितीत नागरिकांना धैर्य आणि खबरदारी घेण्यासंदर्भात माजी सरपंचाकडून जनजागृती केली जात आहे. मागील आठवड्यापासून स्वामी चिंचोली, शेख वस्ती, गुणवरे वस्ती, कुटे वस्ती, ननवरे वस्ती, शिंदे वस्तीवर कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. विशेषतः स्वामी चिंचोली गावातील तरुणांनी एकत्रित येउन सुरु केलेल्या जनजागृतीला लोकांकडून चांगला पृतिसाद मिळत आले. माजी युवा संरपंच अझरुद्दीन शेख यांच्यासह मित्रमंडळींकडून नागकिरांना सुरक्षिततेबद्दल माहिती देण्यात येत आहे. एकंदरीत गावपातळीवर गट-तट आणि गावकीचे राजकारण गढूळ असतानाही माजी युवा सरपंचाने केलेल्या कामगिरीमुळे तालुक्यतील विविध गावांनी आदर्श घेतला आहे.