केडगावमध्ये ऑनलाईन मटका अड्ड्यावर छापा, ९ जण अटकेत, लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – ऑनलाईन जुगारावर बंदी असताना दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी परिसरामध्ये ऑनलाइन मटका (जुगार) चालणाऱ्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून सुमारे पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

केडगाव, बोरीपार्धी परिसरामध्ये ऑनलाइन जुगार, मटका सुरू असल्याची माहिती दौंड उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन बारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी येथे जुगार खेळवत असलेला मटका चालक १) रवींद्र दुर्गा शिंदे रा. केडगाव स्टेशन, बोरीपार्धी ता.दौंड यासह ऑनलाइन मटका खेळत असलेल्या २)आनंद बाळासाहेब दिवेकर रा. कानगाव ता. दौंड. ३) सचिन वासुदेव गोते रा.वरवंड, ता. दौंड ४) दत्तात्रय अशोक माळवतकर रा. कानगाव, ता. दौंड ५) बाळकृष्ण आत्माराम आवचट रा. केडगाव, ता. दौंड. ६) नायकोबा चिमाजी टुले रा. बोरीपार्धी, ता.दौंड ७) धनराज शिवाजी जगताप रा. नांनगाव, ता.दौंड. ८) नवनाथ आनंदा दळवी रा. पाटस, ता. दौंड ९) सुधीर आनंदराव जाधव रा. पाटस, ता. दौंड यांना अटक करण्यात आली तर १०) तेजस कांबळे रा. दौंड आणि ११) राजू दुर्गा शिंदे. रा.केडगाव, ता.दौंड हे दोघेजण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले.

हे सर्वजण रॉयल बिंगो नावाचा ऑनलाइन मटका खेळत होते त्यांच्याकडून ५ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले आहे. या कारवाईमध्ये १० कॉम्प्युटर, मटका बुकिंग घेण्यासाठी वापरण्यात येत असलेले ०३ मोबाईल, ०६ दुचाकी आणि रोख रक्कम असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांसह पो.ना. डी.बी. वायकर, पो.ह. ए. एन. शेख, पो.कॉ. के. एच. वाघ, एस. ए.गुंजाळ, ए. एस. चांदगुडे, जी. बी. कडाळे, व्ही. ए. पवार यांच्या पथकाने केली असून त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक कमलेश होले यांच्याकडून कायदेशीर तक्रार देण्यात आलेली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये रविंद्र दुर्गा शिंदे हा राजू दुर्गा शिंदे याच्या गाळ्यामध्ये हा ऑनलाइन मटका चालवत असल्याचे पुढे येत असून मटक्याच्या आहारी जाऊन एका इसमाने आपली ११ गुंठे जमिन विकून आत्तापर्यंत या ठिकाणी २२ लाख रुपये हरला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने येथे आत्तापर्यंत १७ लाख रुपये मटक्याच्या आहारी घालवले असल्याची चर्चा सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त