कत्तलीसाठी आणलेल्या 42 गायींची सुटका; दौंड पोलिसांनी केला चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहर व परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या ४२ गायांची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दौंड शहरातील इदगाह मैदानाजवळ खाटीक गल्लीत २६ गायी आणि दौंड शहराजवळील लिंगाळी ग्रामपंचायतीमधील कॅनॉलच्या जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये १६ गायी बांधून ठेवल्या होत्या. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या गायींची सुटका केली. ही कारवाई दौंड पोलिसांच्या परिविक्षाधीन उपअधीक्षक मयुर भुजबळ, पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पकडलेल्या गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.