Daund Pune Crime News | पुणे : ‘तुम्ही आमच्या घरगुती भांडणात का पडताय?’, भांडणे मिटवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला

Mumbai Crime News | Drunk youths attack police despite tight police security in the city amid dust storm

पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – Daund Pune Crime News | आलेगाव परिसरातील धुमाळवस्ती येथे पोलिसावर कोयता उगारून पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कांतीलाल रघुनाथ भोकारे आणि अशोक रघुनाथ भोकारे (दोघे रा.आलेगाव, धुमाळवस्ती ता- दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे. (Attack On Cops)

अधिक माहितीनुसार, पोलिसांना धुमाळवस्ती येथून ११२ या क्रमांकावर फोन आला होता. त्यानुसार पोलीस धुमाळवस्ती येथे गेले असता आरोपीच्या घरी घरगुती भांडणे सुरू होती. यावेळी आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालून ‘तुम्ही आमच्या घरगुती भांडणात का पडताय?’, असे म्हणत शिवीगाळ केली. तुमची नोकरी घालवतो असा दमही दिला. त्यानंतर आरोपी पोलिसांवर धावून गेले.

यावेळी अशोक भोकरेने एका पोलिसाला गणवेशात असताना खाली पाडून लाथा बुक्क्याने मारहाण केली तर कांतीलाल भोकरे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

Total
0
Shares
Related Posts