‘बब्बी दा ढाबा’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – तालुक्यातील खडकी येथे असणाऱ्या हॉटेल बब्बी दा ढाबा या ठिकाणी सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका करून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून फरारी असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. आनंद मारुती बोगा ( रा.भिवंडी, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर पळून गेलेल्या दोन अज्ञात इसमांचा शोध सुरू आहे.

खडकी येथे बब्बी दा ढाबा या हॉटेलमध्ये परराज्यातील तरुणींकडून देहविक्री व्यवसाय करून घेतला जातो अशी माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार महाडिक यांनी स.पो.नि. ऋषिकेश अधिकारी, दिलशाद मुजावर, असिफ शेख, निलेश वाकळे या आपल्या पोलीस सहकाऱ्यांचे पथक तयार करून त्यांच्या मदतीने अगोदर बनावट ग्राहक या ठिकाणी पाठवून त्यास मोबाईलवर मिसकॉल देण्यास सांगितले. बनावट ग्राहकाने दोन हजार रुपयांची नोट हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील मॅनेजरला देताच त्याने दोन मुली त्याच्या समोर उभ्या केल्या यावेळी बनावट ग्राहकाने संधीचा फायदा घेत पोलीस निरीक्षक महाडिक यांना फोन केला आणि महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन महिला व तेथे असणाऱ्या मॅनेजरला जागेवरच पकडले.

यावेळी देहविक्री व्यवसायात मदत करणारे दोन इसम तेथून पळून जाण्याचा यशस्वी ठरले. या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करणारा आनंद बोगा याला ताब्यात घेत या ठिकाणी मुंबई व कलकत्ता येथून आणलेल्या दोन मुलींची सुटका करून त्यांची महिला सुधार गृहात रवानगी केली. या प्रकरणी पोलीस नाईक असिफ शेख यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिनेजगत

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

 

 

You might also like