मॉबलिंचिंग : मुस्लिम समाजाचा दौंडमध्ये मोर्चा, दलित समाजाकडून मोर्चास पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – (अब्बास शेख) देशामध्ये मॉबलिंचिंग सारख्या घटना वारंवार घडत असून अश्या घटनांचा निषेध करण्यासाठी दौंडमध्ये आज शुक्रवारी दुपारी मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी दलित समाजातील विविध सामाजिक आणि राजकीय व्यक्तींनी या मोर्चामध्ये सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला.

गांधी चौक ते आंबेडकर चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये मुस्लिम समाजातील युवक, वृद्ध मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मॉबलिंचिंगच्या घटनेमध्ये मारला गेलेला युवक तबरेज अन्सारी याच्या दोषींना फाशी देण्यात यावी, मुस्लिम समाजाला अट्रोसिटी ऍक्ट लागू करण्यात यावा अश्या आशयाचे फलक हातामध्ये घेऊन मुस्लिम युवक रस्त्यावर उतरले होते. मोर्चाचा शेवट हा आंबेडकर चौकामध्ये निषेध सभा घेऊन करण्यात आला यावेळी मॉबलिंचिंग सारख्या घटना घडू नये यासाठी मुस्लिम समाजाला अट्रोसिटी ऍक्ट लागू करावा अशी मागणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांनी केली. यावेळी नागसेन धेंडे( राष्ट्रवादी), भारत सरोदे (आर.पी.आय), अमित सोनवणे( पी.आर.पी कवाडे गट), अश्विन वाघमारे (भारिप) मतीन शेख, यांच्यावतीने मॉबलिंचिंगच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येऊन या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.

तसेच मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना त्वरित शिक्षा देण्यात यावी अन्यथा मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कांसाठी दलित तरुणही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दलित समाजाच्या वतीने देण्यात आला. दौंडच्या तहसीलदारांना पूर्व सूचना देऊनही ते किंवा त्यांचा कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिला नसल्याने दौंडच्या तहसीलदारांबाबत यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. दौंडचे पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

सुंदर आणि लांबसडक केसासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’

Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणा-या विद्यापीठांची होणार चौकशी

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव