अवैध वाळू उपसा करणाऱ्या यंत्रांवर दौंड तहसीलदारांची कारवाई

दौंड – अब्बास शेख – दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी कंबर कसली असून आज बुधवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी तालुक्यात अनाधिकृत वाळू वाहतुक करणारे ४ ट्रक, २ ट्रॅक्टर  पकडण्या त्यांना यश आले आहे तर मौजे नानगाव येथे अनाधिकृत वाळू उपसा करणारे तराफे नष्ट करून त्यांनी वाळू माफियांना चपराक दिली आहे.

दौंड तालुक्यात भीमा नदी पात्रामध्ये मोठ्याप्रमाणावर चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करण्यात येत आहे त्यामुळे महसूल विभागाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते परंतु दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करत वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. दौंड महसूल पथकाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.