दौंड : दोघात ‘तिसरा’, सध्यातरी ‘विसरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण एकीकडे आणि दौंड तालुक्याचे राजकारण एकीकडे असे म्हटले जाते. ते कोणत्याही बाबतीत चुकीचे नाही. दौंड तालुका कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी डोक्यावरून खाली आपटेल याचा काहीच नेम नाही आणि याचा भल्याभल्यांना चांगलाच अनुभव आला आहे मग तो २००९, २०१४ किंवा २०१९ ची लोकसभा, विधानसभा निवडणूक असो या तालुक्याचा अनुभव कुल, थोरात यांसह खा.सुप्रिया सुळेंनीही घेतला आहे.
दौंड तालुका हा २००१ सालानंतर विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटामध्ये विभागला गेला तो आजपर्यंतही तसाच विभागून आहे.

तालुक्यावर पकड कुणाची यावरून या दोन्ही गटामध्ये कमालीची इर्षा पाहायला मिळते. तालुक्यामध्ये या दोन प्रबळ गटांमुळे तिसरी शक्ती अजूनपर्यंत उदयास आलीच नाही आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला ते एकतर पुन्हा याच गटांना जाऊन मिळाले किंवा राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत. तालुक्यामध्ये दोन्ही गटांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कित्येकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या दोन गटांना छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. पण जनतेच्या कौलापुढे ते निष्प्रभ ठरले गेले. तालुक्यात फक्त कुल आणि थोरात असाच सामना आत्तापर्यंत नागरिकांना पहायला मिळाला असून यांच्यामध्ये तिसऱ्याला अजून स्थानच मिळाले नाहीये. तालुक्याच्या रोषाचा सामना येथील स्थानिक नेत्यांनाही अनेकवेळा करावा लागला आहे त्यामध्ये २००९ ला सर्व अनुकूल असूनही राहुल कुल यांना जनतेने नाकारले होते तर २०१४ सालीही वातावरण चांगले असूनही रमेश थोरतांना विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. तसाच काहीसा अनुभव आ.राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला आहे.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत आ.राहुल कुल हे साडे अकरा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले होते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये कांचन कुल मात्र स्थानिक उमेदवार असतानाही त्यांना खा.सुप्रिया सुळेंपेक्षा फक्त सात हजारांचे मताधिक्य दौंडमधून मिळाले महादेव जाणकरांना मात्र याच तालुक्यातून गेल्या लोकसभेवेळी २५,५०० चे मताधिक्य मिळाले होते कुल यांना तालुक्यातून हवे तसे मताधिक्य मिळवता आले नाही याची सल कुल समर्थकांमध्ये आजही दिसून येत आहे. तालुक्याची सध्याची मतदार संख्या हि तीन लाखाच्या घरात असून दोन्ही गटांकडे यातील ४०-४० टक्के मतदार राजा आहे. दरवेळेस १०% टक्के लोकांवर कुल किंवा थोरात यांचे भवितव्य अवलंबून असते. दोन्ही दिग्गजांचा विजय हा केवळ १० ते १५ हजरांच्या फरकाने होत आला आहे. त्यामुळे सध्यातरी या दोन नेत्यांशीवाय दौंड तालुक्याला तिसरा पर्याय नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कारण जनता नेहमीच कुल किंवा थोरात यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली दिसली आहे. विधानसभा निवडणूक जवळ येताच अनेकजण तिसऱ्या पर्यायाची आर्त हाक देत उभे ठाकतात पण तालुक्यातील चतुर जनता मात्र मतदान करताना कुल किंवा थोरात यांनाच पसंती देताना दिसते. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांपासून कुल किंवा थोरात यांपैकीच एकजण निवडून येत आहे. आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे निवडणुकीचे बिगुल वाजताच अनेकजण विधानसभेसाठी दावा करणार आहेत आणि तो लोकशाहीचा अधिकार ही आहे. या ही निवडणुकीलाही कुल आणि थोरतांवर मिलीभगतचे आरोप होतील, कुल-थोरातांनी इतकीवर्षे तालुक्यासाठी काय केले? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊन वातावरण तापवले जाईल पण हे होत असताना कुल किंवा थोरात असाच काहीसा सूर तालुक्यातील जनतेचा मात्र दिसत आहे कारण सध्यातरी तालुक्यात विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या इतके अन्य बलाढ्य प्रतिद्वंद्ववी दिसून येत नाहीत.  विशेष म्हणजे राजकीय पक्षांपेक्षा याच दोन नावांची चलती तालुक्यामध्ये जास्त आहे.

तालुक्यात कुलांना टक्कर देणारा थोरात गटाशीवाय कुणीही नाही आणि थोरतांनाही टक्कर देणारा कुल गटाशीवाय कुणीही दिसत नाही त्यामुळे दोघांत तिसरा, सध्यातरी विसरा असेच म्हणावे लागत आहे.

सिनेजगत

 

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

 

Loading...
You might also like