चौफुला MIDC आणि मुळशीच्या पाण्यामुळे दौंडचा कायापालट होणार : आ.राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्याचे खऱ्या अर्थाने भाग्य बदलणारे अनेक प्रकल्प आता आम्ही आपल्या तालुक्यामध्ये आणले आहेत. या प्रकल्पांपैकीच एक म्हणजे युवकांना रोजगार देणारी चौफुला MIDC आणि तालुक्यातील शेतीला आणि पिण्यासाठी मुबलक प्रमाणावर उपलब्ध होणारे मुळशीचे पाणी हे असून या दोन प्रकल्पांमुळे दौंडचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून हे प्रकल्प सुरू करण्यास आम्हाला पुन्हा एकदा संधी देईल असा विश्वास दौंडचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना या प्रकल्पांमुळे हजारो युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून आपल्या दौंड तालुक्यातील तरुणांना आता इकडे तिकडे जाऊन नोकरी शोधत बसावी लागणार नाही तर थेट आपल्या तालुक्यातच नोकरी आणि रोजगाराची मोठी संधी चौफुला येथील MIDC च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुळशी धरणाचे पाणी आता तालुक्यात येणार असून या पाण्यामुळे तालुक्यातील सर्वच भाग हा ओलिता खाली येणार आहे. ज्या ठिकाणी आत्तापार्यंत दुष्काळ सदृश परिस्थिती असायची आता तेथेही उसाचे आणि जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेता येणार आहे. त्यामुळे आता तालुक्यातील जनतेनेही सजग राहून मतदान करावे आणि तालुक्याला विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या माझ्या सारख्या तरुणाला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

तालुक्यामध्ये अनेकजण या गोष्टींना फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून जर हिनवत असतील तर मी त्यांना या प्रकल्पाचे निघालेले नोटिफिकेशन अवश्य पहायला देईल आणि ज्यांनी माझ्या प्रांत कार्यालयावरील मुद्द्याला हसण्यावारी नेले होते तेच आता तालुक्यात प्रांत कार्यालय मंजूर होऊन तसा जीआर निघाल्यावर तोंडघशी पडले आहेत. तश्याच पद्धतीने आता ज्यावेळी चौफुला MIDC चे काम सुरू होईल आणि मुळशीचे पाणी थेट आपल्या शेतात येईल त्यावेळी हे विरोधक त्यावर एक अक्षरही बोलणार नाही असे सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी