राजकीय समीकरणे जुळताच दौंडकरांना मोठी गुडन्यूज मिळणार!

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)  – राज्यामध्ये विधानसभेचे निकाल लागताच राजकीय समिकरणांच्या जुळवाजुळविला मोठा वेग आला आहे. राज्यात कमबॅक करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या गड असलेल्या बारामतीच्या बांधावर राहुल कुल रुपी भाजपचे कमळ फुलल्याने चिंता वाढल्या आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता महायुतीची समीकरणे जुळताच दौंडला मोठी गुडन्यूज मिळेल असे पोषक वातावरण सध्या बनले आहे.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेने पुणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारून राष्ट्रवादीला नामोहरम केले होते मात्र विधानसभेच्या नुकत्याच आलेल्या निकलांवरून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात कमबॅक केले आहे. आघाडीने आपले शिरूर, पुरंदर, मावळ हे गड पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन भोर, इंदापूर हे जुने गड ही राखले आहेत.

परंतु याला अपवाद फक्त दौंड तालुका राहिला आहे. दौंड तालुक्यातही काटे की टक्कर होऊन भाजपचे राहुल कुल हे राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांना शह देण्यात यशस्वी झाले आहेत. विधानसभा निवडणुकी दरम्यान राहुल कुल यांच्या झालेल्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो असे आवाहन केले होते.

दौंडकरांनी आपला शब्द पाळत राहुल कुल यांना पुन्हा एकदा निवडून दिले आणि आता त्यांना भाजपकडून मंत्रिपद देण्यात येईल याची खात्री वाटत आहे. वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडल्याने आता पुणे ग्रामीणमध्ये राहुल कुल यांना भाजपकडून मंत्रिपद देऊन राष्ट्रवादीला पर्यायानेच बारामतीला लगाम घालण्याचे प्रयत्न केले जातील यात शंका नाही. त्यामुळे सरकार स्थापन होताच दौंडकरांना मोठी गुडन्यूज मिळेल असे भाकीत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

 

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा