दौंडचे भाजप आमदार राहूल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आमदारांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, राहुल कुल यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

काही दिवसांपूर्वी दौंडचे माजी नगराध्यक्ष यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आमदार राहुल कुल यांनीही कोरोना चाचणी केली होती. आज त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत, शिवाय राहुल कुल यांच्या कुटुंबीयांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.

आमदार राहुल कुल हे मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने अधिकारांच्या बैठकी घेत होते, आरोग्य विभाग, प्रांत अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करुन योग्य त्या सूचना करीत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like