दौंडच्या शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न.. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – शेत जमिनीवरील पुनर्वसनचे शेरे कमी करण्यासाठी हेलपाटे मारून कंटाळलेल्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

धनाजी गेनबा धुमाळ असे या शेतकऱ्याचे नाव असून ते दौंड तालुक्यातील सोनवडी या गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सातबारावर असणारे पुनर्वसन भोगवटा वर्ग दोनचे शेरे कमी करण्यासाठी सर्व कागदपत्रे जमा करूनही कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वर्षानुवर्षे वारंवार हेलपाटे मारून कंटाळल्याने या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी येऊन या शेतकऱ्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

‘एनएमसी’ विधेयकामुळे पुन्हा केंद्रविरूद्ध डॉक्टर संघर्षाची शक्यता

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी

Loading...
You might also like