ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूच्या 4 वर्षाच्या मुलीला लागले ‘विराट कोहली’ होण्याचे वेध!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. अनेक तरुण खेळाडूंना आपण विराट कोहलीसारखा यशस्वी फलंदाज व्हावे असे वाटते. मात्र सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती क्रिकेट खेळताना दिसून येत असून तिला देखील विराट कोहली व्हायचे आहे.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या लेकीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तिच्या लेकीला विराट कोहली व्हायचे आहे. वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर आता तो पुन्हा एकदा संघाकडून खेळण्यासाठी तयार असून आयपीएलमध्ये देखील त्याने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यानंतर आता त्याच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये ती बॅटिंग करताना दिसून येत आहे.

ताणें हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर पोस्ट केला असून त्याच्या पत्नीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले हे कि, हिला विराट कोहली व्हायचे आहे काय ?
दरम्यान, विराट कोहली सध्या विश्रांती घेत असून त्याने नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती घेतली आहे. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like