David Warner | “त्याला बळीचा बकरा बनवले; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – David Warner | ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आक्रमक आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, दक्षिण ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर पक्षपाती पूर्व पुनरावलोकनचा आरोप केला. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधार होण्याच्या आशा मावळल्या आहेत. वॉर्नरची लीडरशिप बॅन केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी यावर आपले मत मांडले आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल क्लार्कने वॉर्नरच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य केलं आहे. (David Warner)

 

काय म्हणाला मायकल क्लार्क?
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर टीका करत वॉर्नरचे समर्थन केले आहे. “डेव्हिड वॉर्नर खूप निराश आणि दु:खीही आहे. मात्र, स्टीव्ह स्मिथकडे कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोपवले जात असल्याने तो निराश झाला आहे. ऑस्ट्रेलियन बोर्डाचा वॉर्नरबाबतचा दृष्टिकोन योग्य नाही. तसेच एका खेळाडूसाठी वेगळे नियम आणि दुसऱ्या खेळाडूसाठी वेगळे नियम, यावर विश्वास ठेवणे अजिबात योग्य नाही. मात्र, बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर कोणत्याही खेळाडूला कर्णधारपदापासून दूर ठेवणे योग्य ठरेल, असे ऑस्ट्रेलिया बोर्डाला वाटत असेल.” (David Warner)

 

क्लार्क म्हणाला की, ”जर स्मिथकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते आणि वॉर्नरवर अजूनही बंदी आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरला बळीचा बकरा बनवत आहे.
वॉर्नरवर जेव्हापासून नेतृत्वाची बंदी घालण्यात आली तेव्हापसून तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
यादरम्यान काही दिवसांपूर्वी डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत
”माझे क्रिकेट माझ्या कुटुंबापेक्षा महत्त्वाचे नाही आणि पुन्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणात ओढू नये.”
तसेच पुढील 12 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत डेव्हिड वॉर्नरने यावेळी दिले.

 

Web Title :-  David Warner | former player michael clarke said cricket australia has made david warner a scapegoat in leadership ban case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज