वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय गोलंदाज ‘गंभीर’ जखमी

ओव्हल : वृत्तसंस्था – सध्या वर्ल्ड कपचे सामने सुरु असून या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचा रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलिया बरोबर सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून इतर संघाना हलक्यात न घेण्याचा एक प्रकारे इशाराच दिला आहे. पण, भारताचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तितक्याच ताकदीनं मैदानावर उतरण्यास सज्ज होत आहेत.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. या सरावादरम्यान डेव्हिड वॉर्नरने टोलावलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर आदळला. भारतीय वंशाच्या या गोलंदाजाला त्वरीत उपचारासाठी स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत दोन विजय मिळवले आहेत.

परंतु वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची सलामीची फळी ढेपाळली, परंतु स्टीव्हन स्मिथनं (७३) संयमी खेळ करताना संघाचा डाव सावरला. त्याला अ‍ॅक्स कॅरी ( ४५) आणि नॅथन कोल्टर नील ( ९२) यांची तुल्यबळ साथ लाभल्यानं ऑस्ट्रेलियाने २८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला २७३ धावा करता आल्या.

पण, या सामन्यात वॉर्नर अपयशी ठरला आणि त्याला भारताविरुद्ध मोठी खेळी साकारायची आहे. त्यासाठी त्यानं शनिवारी नेटमध्ये कसून सराव केला, परंतु जोरदार फटकेबाजी करताना त्यानं मारलेला चेंडू सराव गोलंदाजाच्या डोक्यावर आदळला आणि तो तेथेच जमिनीवर कोसळला. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला खेळवले जाईल कि नाही हा प्रश्न चिन्हच आहे.