‘मी थकव्यामुळं निवृत्तीचा विचार करतोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हीड वॉर्नरनं पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्रिशतकीय खेळी करत 335 धावा केल्या. डेव्हीड वॉर्नर आता निवृत्त होण्याचा विचार करत आहे. सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणाऱ्या वॉर्नरनं आपल्या त्रिशतकानंतर आता निवृत्तीचा इशारा दिला आहे.

पुढील वर्षी ट्वेंटी 20 विश्वकरंडकानंतर ट्वेंटी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे असं वॉर्नरनं सांगितलं. त्याला आपल्या कसोटी क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे.

ट्वेंटी 20 विश्वकरंडकानंतर निवृत्ती
डेव्हीड वॉर्नरनं सांगितलंय की, “अ‍ॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवसानंतर ट्वेंटी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करेन.” वॉर्नर म्हणाला, “माझ्या मते माझ्या निवृत्तीवर मी विश्वकरंडकानंतर विचार करेन. 6 महिन्यांनंतर विश्वकरंडक खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या अनेक चांगले युवा खेळाडू येत आहेत आणि त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे.”

वॉर्नरला जाणवतोय थकवा
वॉर्नर म्हणाला, “मी थकव्यामुळं ट्वेंटी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत आहे. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा तुमचे पाय थकतात. मी अजून ठरवलं नाहीये की मी कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार.”

Visit : policenama.com

 

You might also like